Friday, 17 July 2015

My First Dream Rain


I Love Rain
पाऊस सगळ्यांचाच असतो.
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो.
मलाही पाऊस माहीत आहे.
मीही पाऊस कधीतरी.
भोगलेला आहे झेललेलाही आहे.
माझ्यासाठी पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप जेव्हा मारायचा
माझ्या आईला योगायोगाने नाही.
पण
पाऊस बाहेर पडत रहायचा
माझ्या आईचे पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे तिच्या डोळ्यातील
पाऊस तोच पाऊस मला आठवतो
तोच पाऊस मला माहित आहे
माझ्यासाठी पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
 अश्रू, हंबरडा आणि मूक विलाप
माझ्या आईचा पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा आणि माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा...