एखादी मैत्रीण असावी .....
थोडं हसवणारी थोड रागवणारी
पण अचूक मार्ग दाखविणारी
एखादी मैत्रीण असावी…
थोडं समजाविणारी थोडं समजून घेणारी
पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी
एखादी मैत्रीण असावी…
थोडी काळजी घेणारी थोडे अश्रू पुसणारी
अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणारी
एखादी मैत्रीण असावी…
मनातील भावना जाणणारी
नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी
एखादी मैत्रीण असावी…
साद घातल्यावर धावत येणारी
तो प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी