Thursday, 1 October 2015

Marathi kavita : कधीतरी असं व्हावं

कधीतरी असं व्हावं
कि तिने ही माझ्या प्रेमात पडावं,
तिचं ही ह्रदय ह्रदयाशी माझ्या जुळावं...
कधीतरी असं व्हावं
कि, तिची हि नजर माझ्याकडे वळावी,
आणि तिचे ही शब्द माझ्यापुढे मुके व्हावे...
कधीतरी असं व्हावं
कि, तिचं हि मन माझ्यासाठी झुरावं,
ठेस मला लागताच काळीज तिचं रडावं...
कधीतरी असं व्हावं 
कि, तिने हि मला वचन द्यावं,
आणि आयुष्यभर सोबत माझ्या रहावं...
कधीतरी असं व्हावं 
कि, तिने ही सोबत माझ्या जगावं आणि 
जिवापाड प्रेम माझ्यावर करावं... 
                                                                     (आकाश ) Sky :-)