Thursday, 1 October 2015

Marathi kavita :एकदिवस मी अधीर झालो


एकदिवस मी अधीर झालो  मन माझे परतले नाही 
    काय ठाऊक काय झाहले  मला काही उमगले नाही

कुठे हरविला कुठे राहला काही चुकले तर नाही 
    त्यादिवशी तो फिरता फिरता मज सोडूनं गेला तर नाही

याच विचारी गुंथून होतो   अचानक चाहूल झाली 
    डोळे वरती करून बघतो  मनराजाची स्वारी आली

मन उदास होता वेडा कुठला  हसतं नाही बोलतं नाही 
    करू काय याला हसवाया   हा तर काही मानत नाही

कुणाशी नाही वैरही याचा   काय करावे सुचतं नाही 
    रडतो फक्त हा अधुनी मधुनी   राग जीवाचा गातही नाही

मागणी केली उत्तर द्यावे  पण काही सांगत नाही  
    काय घडले कुठे हरवले   भेद मनाचे खोलत नाही

एकदिवस मन मला म्हणाला मीरे आता तुझ्यात नाही 
    मी झालो आता दुसऱ्याचा  तुला कधी मिळणार नाही

त्यादिवसाला रस्त्यावरती  बघितले मी फिरतांना 
    कुणीतरी जवळुनी माझ्या   हलकेच दूर जातांना 
   
दूर जातांना सोबत अपुल्या   ती मलाही घेऊन गेली 
    रूप देखणे जणू चांदणे  ती मलारे हरवून नेली

बोलाचा मन बोलून गेला  सांगाचे सांगून गेला 
    ऐकून मलाही विचार पडला   कि काय घोळ हा झाला

देतं कुणाला ह्रुदयभान हा  लपवित तर काही नाही 
    प्रेमाचा तो खेळ निराळा   मन हरवून तर आला नाही

जानिला मी भेद मनाचा  जरी तो सांगत नाही 
    हा तर होता खेळ प्रेमाचा  ज्याचा अंत सुंदर नाही

एकदिवस मग मी सांगितली  गोष्ट काही मोलाची 
    कोण होती ती स्वप्न सुंदरी  जी वळून बघतही नाही

रस्त्यावरती अनोड्खीशी  एक मुलगी बघितली 
    हरवून बसला तुजला तुरे   जी बघून हसतही नाही

आकर्षण जो एक क्षणांचा  तो प्रेम म्हणवत नाही 
    प्रेम म्हणजे घोर तपस्या  जो तुलारे जमत नाही

अरे मना मी तुला सांगतो  कित्येक आले गेले 
    प्रेमाच्या या खेळामध्ये  सर्व हरवूनी मेले

तरीही म्हणतो तुला मिळावी   जी तुला मिळणार नाही    
    लाख प्रयत्नं केले तरीही   तुझी ती होणार नाही

माझे म्हणणे पटले होते   त्याने मान हलविली 
    मला थांबवून मजला म्हणला   आता बोलायचे नाही

दे मला तू वेळ जरासा  विचार करतो आहे 
    सांगीतलेल्या तू बोलाचा    चिंतन करतो आहे

काही दिवस मग गप्प होऊनी   मन विचार करीत बसला 
    एकदिवस मग हसता रडता  येऊनी मला बिलघला

रडता रडता मला म्हणाला  फार मोठी चूक मी केली
    तुझ्यासारख्या माणसाची   फसवणूक माझ्याने झाली

तूच माझारे पाठीराखा   तुझ सोडून कसा मी जाऊ 
    तुझ्या सारखा मित्र गावला  मग दुसरे जग कशाला पाहू 
    
चूक माझी ही पहिली वहिली  पुन्हा चुकणार मी नाही 
     तुझ्याविनारे कुणाच्या मागे   मी कधी दिसणार नाही

प्रेमाचा मग खेळ संपला   मन जोरजोराने हसला 
    अश्याप्रकारे मन हा माझा   माझ्यातच येऊनी बसला 

अश्याप्रकारे मन हा माझा   माझ्यातच येऊनी बसला  

                                                              (आकाश ) Sky :-) 

कृपया आवडल्यास नावानिशी समोर पाठवावी आणि काही कमी भासल्यास कल्पना द्यावी